कोल्हापूर : लक्ष्मीपुरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिसांनी वकील तौसिफ शेख यांना केलेल्या मारहाणीचा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत शुक्रवारी निषेध केला.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

kolhapur | वकिलास मारहाण करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई करा

बार असोसिएशनचा ठराव; वकील कामकाजापासून अलिप्त

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिसांकडून वकील तौसिफ खलील शेख यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत शुक्रवारी तीव्र पडसाद उमटले. पोलिस ठाण्याच्या आवारात वकिलांच्या अंगावर हात टाकणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई व्हावी, अशा मागणीचा ठराव या विशेष बैठकीत करण्यात आला. यासंदर्भात लवकर पोलिस अधीक्षकांशी भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कसबा बावडा येथील न्याय संकुलमधील राजर्षी शाहू महाराज सभागृहात झालेल्या विशेष सभेत वकिलास झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत अ‍ॅड. शिवाजीराव राणे, गिरीश खडके, संपतराव पवार, प्रशांत चिटणीस,दत्ताजी कवाळे, राजेंद्र मंडलिक, प्रकाश मोरे, मनोज पाटील, मनिषा सातपुते, प्रमोद दाभाडे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी एक दिवस कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे बारचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. आर. पाटील यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना लवकरच निवेदन देण्यात येणार असल्याचेही अध्यक्षांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT