कोल्हापूर : पंगचंगा आरती भक्त मंडळातर्फे नित्य होणारी पंचगंगा नदीची आरती बुधवारी वेगळी ठरली. पोलंडवासीयांनी आरतीला उपस्थिती लावत सर्वांनाच सुखद धक्का दिला.
मंडळातर्फे दररोज सायंकाळी सहा वाजता पंचगंगा घाटावर पंचगंगेची आरती केली जाते. गेली 17 वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. ऐन पावसाळ्यातही आरतीत खंड पडत नाही. महापुराचे पाणी जिथे थांबते तिथे आरती केली जाते. दररोज आरतीच्या वेळी दर बुधवारी पोहे आणि संकष्टीला खिचडी वाटप केले जाते. रविवारच्या नियमित आरतीवेळी पोलंडवासियांनी हजेरी लावली. त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी महेश कामत, सुधाकर भांडीग्रे, प्रफुल्ल भाट, अवधूत भाट, किशोर घाटगे, राजेंद्र बुचडे, चंद्रकांत हांडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचगंगा घाटावर गर्दी
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) कोल्हापूरतर्फे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाआरतीच्या अनुषंगाने भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. महाआरती रद्द झाल्याची माहिती नसल्याने भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे इस्कॉनतर्फे कीर्तनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.