Phulewadi murder Case | तडीपार गुंडाचे चार मारेकरी गजाआड; फार्म हाऊसवर शिजला कट Pudhari File Photo
कोल्हापूर

Phulewadi murder Case | तडीपार गुंडाचे चार मारेकरी गजाआड; फार्म हाऊसवर शिजला कट

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोडवरील गंगाई लॉनच्या पिछाडीस झालेल्या तडीपार गुंड महेश राजेंद्र राख (23, रा. अहिल्याबाई होळकरनगर, कोल्हापूर) खूनप्रकरणी संयुक्त शोध पथकाने गवळी बंधू टोळीतील चौघा मारेकर्‍यांना रविवारी अटक केली.

पीयूष अमर पाटील (23, रा. कणेरकरनगरजवळ, ), मयूर दयानंद कांबळे (22, साने गुरुजी वसाहत), सोहम संजय शेळके (22, वारे वसाहत), बालाजी गोविंद देऊळकर (26, पाचगाव) यांना संयुक्त पथकाने अटक केल्याचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, सहायक निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी सांगितले.

टोळीचा म्होरक्या सिद्धांत गवळी, आदित्य शशिकांत गवळी (दत्त कॉलनी, फुलेवाडी), धीरज शर्मा (रामानंदनगर), ऋषभ साळोखे-मगर (पाचगाव) सद्दाम कुंडले (बी. डी. कॉलनी, कोल्हापूर) या संशयितांनी कर्नाटक किंवा गोव्याकडे पळ काढल्याची वरिष्ठांची माहिती आहे. पोलिसांची तीन पथके कर्नाटकसह विविध भागात रवाना झाली आहे. गवळी टोळीशी संबंधित नात्यातील व्यक्तीची फुलेवाडी रिंग रोड परिसरात मटका व्यवसाय तेजीत आहे. फार्म हाऊसमधून बुकी चालविली जाते, तिथेच महेश राख याच्या खुनाचा कट शिजल्या चौकशीतून पुढे येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT