Fraud case | फुलेवाडीतील सराफाला फसवणूकप्रकरणी अटक 
कोल्हापूर

Fraud case | फुलेवाडीतील सराफाला फसवणूकप्रकरणी अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दीड तोळ्याच्या सोन्याच्या हाराला गोंडा लावून देण्याच्या बहाण्याने 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा हार परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी फुलेवाडी येथील सराफ ऋषिराज संभाजी महेकर (रा. पाचवा बसथांबा, नवसंघर्ष अंगणवाडीजवळ) याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीमती स्मिता तुषार हिरवे (वय 40, रा. श्रीकृष्ण पार्क, फुलेवाडी, कोल्हापूर) यांच्या फिर्यादीनुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून 2025 मध्ये हा प्रकार घडला. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, फिर्यादी हिरवे आणि सराफ महेकर यांची ओळख आहे. संशयित सोनारकाम करीत असल्याने फिर्यादी यांनी 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 15.58 ग्रॅम सोन्याच्या हाराला गोंडा लावून देण्यासाठी संशयिताकडे हार दिला होता.

सोन्याचा हार आज देतो, उद्या देतो असे सांगून सराफ वारंवार चालढकल करीत होता. फिर्यादीला सतत खोटे सांगून फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच हिरवे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी त्यास शुक्रवारी रात्री अटक केली. पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT