कोल्हापूर

पन्हाळा : माजगांव पैकी माळवाडीत विनापरवाना मुरूम उत्‍खनन प्रकरण; ५ जणांना ६५ लाखाचा दंड

निलेश पोतदार

पन्हाळा : पुढारी वृत्त सेवा पन्हाळा तालुक्यातील माजगांव पैकी माळवाडी येथील विना परवाना मुरूम उत्खनन केल्या प्रकरणी पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी पाच जणांना ६५ लाख रूपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

तब्बल १२५० ब्रास बेकायदेशीर व विनापरवाना मुरुमाचे उत्खनन केल्याबद्दल आनंदराव बापूसो चौगुले, सर्जेराव विष्णू चौगुले, तानाजी ईश्वरा कुंभार, लक्ष्मी ईश्वरा कुंभार व शिवाजी ईश्वरा कुंभार या पाच शेतकऱ्यांना ६५ लाख रुपयांचा दंड भरण्याबाबत तलाठ्यांमार्फत नोटीसा बजावल्या आहेत. महसूल विभागाने पाठवलेल्या या नोटीसांमुळे संबंधित शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या बाबतचे माजगाव सज्जाच्या तलाठी गीता पाटील व कोतवाल विनोद कुंभार यांनी मुरूम काढलेल्या ठिकाणचे रीतसर पंचनामे करून पन्हाळा तहसिलदार यांना सादर केले होते.

माजगांव पैकी माळवाडी येथील डोंगर भागात दरा नावाच्या जमिनीत गट क्र. २७७ मध्ये अंदाजे ८०० ब्रास व गट क्र. २४४ मध्ये ४५० असे एकूण १२५० ब्रास मुरूमाचे अनधिकृतरित्या उत्खनन करण्यात आले आहे. ८०० ब्रास मुरुमाचे उत्खनन करणाऱ्या आनंदराव चौगले व सर्जेराव चौगले यांना बेचाळीस लाख (4200000/-)रुपये दंड करण्यात आला तर गट क्रमांक २४४ जमीनीवर ४५० ब्रास मुरुमाचे उत्खनन करणाऱ्या तानाजी कुंभार, लक्ष्मी कुंभार शिवाजी कुंभार यांना तेवीस लाख बासष्ठ हजार पाचशे (23,62523/-) इतकी रक्कम दंड म्हणून वसूलीची नोटीस संबंधित शेतकऱ्यांना महसूल विभागाने पाठवली आहे.

जमिन महसूलाची थकबाकी म्हणून आपलेकडून का वसुल करणेत येवू नये, याचा लेखी खुलासा नोटीस मिळाले पासून ७ दिवसाचे आत समक्ष उपस्थित राहून सादर करावा. खुलासा सादर करणेस कसूर केलेस अगर न सादर केलेस आपण वरील प्रमाणे दंडात्मक व फौजदारी कारवाईस पात्र रहाल. तसेच सदरची शासकीय रक्कम जमिन महसूलाची थकबाकी म्हणून आपणांकडून वसुल करणेत येईल असा नोटिसद्वारे इशारा दिला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT