पन्हाळा : आ. विनय कोरे यांनी कोडोली येथे, तर आ. चंद्रदीप नरके यांनी बाजार भोगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 
कोल्हापूर

Graduate Constituency Election | पन्हाळा : पडळ केंद्रावर सर्वाधिक मतदान

'पदवीधर'साठी चुरशीने ७५.९३ टक्के मतदान

पुढारी वृत्तसेवा

पन्हाळा : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पन्हाळा तालुक्यातील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पदवीधर मतदारसंघासाठी सरासरी तब्बल ७५.९३ टक्के मतदानाची नोंद झाली असून, तालुक्यातील एकूण ६,९६५ पैकी ५,२८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पडळ केंद्रावर सर्वाधिक ७४.९८ टक्के मतदान नोंदवले गेले.

कोडोली येथील कुमार केंद्रशाळेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व आ. चंद्रदीप नरके यांनी बाजार भोगाव येथील आबासाहेब भोगावकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.याशिवाय आसुर्ले येथे ७१.६४ टक्के, कोतोलीत ७१.३१ टक्के, कळे केंद्रावर ६९.२६ टक्के, पन्हाळा शहरात ६८.६३ टक्के, बाजारभोगाव येथे ६६.३५ टक्के, तर सातवे केंद्रावर ६१.६१ टक्के मतदान पार पडले.

कोडोली केंद्रावर शिक्षक मतदारसंघासाठी ४०४ पैकी ३६१ मतदारांनी मतदान करत विक्रमी ८९ टक्के मतदानाची नोंद केली, तर पदवीधर मतदारसंघासाठी कोडोलीमध्ये ६०.४० टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात गर्दी नसली, तरी दुपारनंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये उच्चशिक्षित तरुण-तरुणी आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोडोली पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन डीवायएसपी श्रीकांत ठिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT