कोल्हापूर

Majhi Vasundhara : ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पन्हाळा नगरपरिषदेचा राज्यात दुसरा क्रमांक

backup backup

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा नगरपरिषदेने राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाअंतर्गत येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये सलग दुसऱ्यांदा उत्तुंग कामगिरी केली आहे. १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

दिनांक ५ जून २०२३ रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जमशेद भाभा थियटर, मुंबई येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते पन्हाळा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, अजित चौरे, मुकुल चव्हाण आणि तानाजी ननावरे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांचे स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानामध्ये सलग उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे विशेष अभिनंदन केले आणि पन्हाळा नगरपरिषदेस लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, महाराष्ट्र विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, पर्यावरण मंत्रालयाने सचिव प्रवीण दराडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरण रक्षण आणि संवर्धन संदर्भात केलेल्या कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पन्हाळा नगरपरिषद मार्फत शहरात विविध ठिकाणी हरित क्षेत्र, उद्याने तयार करण्यात आलेले आहेत. शहरात स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक इमारतीवर सोलर यंत्रणा, पाण्याचे संवर्धन, सोलार पथदिवे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर याबाबत जनजागृती, ऊर्जा बचत, नागरिकांना मोफत विद्युत वाहन स्टेशन, सार्वजनिक इमारतीचे एनर्जी ऑडिट आणि वॉटर ऑडिट, सायकल ट्रॅक, प्लास्टिक बंदी, १००% कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्यावर प्रक्रिया, विविध जनजागृती चे कार्यक्रम अनेक कामे आणि उपक्रम राबवण्यात आल्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी दिली. मा. आ. डॉ. विनय कोरे (सावकार), माजी नगराध्यक्षा सौ. रुपाली धडेल, सर्व माजी नगरसेवक/नगरसेविका, सर्व नागरिक, सर्व सफाई मित्र, नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन करून आभार मानले. या अभियानासाठी नोडल अधिकारी मुकुल चव्हाण आणि अजित चौरे यांच्या मेहनतीचे फळ मिळाले असून हा शहराचा सन्मान असल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी म्हणाले.

स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानामध्ये ही मध्ये सलग पुरस्कार प्राप्त झाल्याने माजी नगराध्यक्षा सौ. रुपाली रवींद्र धडेल यांनी शहरवासियांचे तसेच प्रशासनाचे अभिनंदन करून आभार मानले. तसेच येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ आणि माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये पन्हाळा शहराचे देशपातळीवर अशीच घोडदौड चालू राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT