कोल्हापूर

पन्हाळा किल्याबाबत चुकीचे संदेश पसरवणाऱ्या संघटनांच्या निषेधार्थ आज पन्हाळा १०० टक्के बंद

Shambhuraj Pachindre

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा; गेल्या काही दिवसांपासून किल्ले पन्हाळगडाबाबत सोशल मीडियावरून चुकीचे संदेश व्हायरल करणे, तसेच येथील व्यवसायिकांनी संघटनेच्या सुचनेनुसार वागावे यासाठी दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न संघटनांच्या वतीने पन्हाळा येथे सुरू आहेत. त्याच्या निषेधार्थ पन्हाळा गडावरील नागरिक व व्यावसायिकांकडून बंद पाळण्यात आला.

गेले तीन चार महिने पन्हाळ्यावर बाहेरील संघटना येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पन्हाळ्यातील नागरिक गड सांभाळू शकत नाहीत. गडावर संघटना सांगतीलप्रमाणे पर्यटकांनी फिरले पाहिजे, पन्हाळा गडावर इस्लामी अतिक्रमण असता कामा नये, गडावर मावळ्यांच्या वेशात लोक वावरले पाहिजेत. गडावर घोडा गाड्या असल्या पाहिजेत अशा चुकीच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. याच्या विरोधात गडावरील नागरिकांनी एकजूट होऊन अशा संघटनांच्या विरोधात लढा देण्याचे ठरवले असून त्याचा पहिला टप्पा म्हणून आजचा बंद पाळण्यात आला.

दरम्यान पन्हाळ्यावर पर्यटकांना फिरण्यासाठी लंडन बस हे वाहन आहे. एका संघटनेने वाहनावरील लंडन बस ही अक्षरे काढून नेली व त्या ठिकाणी दहशत माजवली. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. तक्रार देऊनही अजून कारवाई झालेली नाही. पन्हाळावरील नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वयंघोषित गडप्रेमीनीं गडावर येऊन नागरिकांना गडाबाबत सुचना करून पन्हाळ्यातील नागरिकांची सोशल मीडियावर बदनामी केली जात आहे. त्याचा कडाडून विरोध करण्यासाठी आजचा बंद पाळण्यात आला. आजच्या पर्यटकांचे हाल झाले. पर्यटकांना पाणी देखील विकत मिळू शकले नाही. यावेळी पर्यटकांनी देखील अशा प्रकारे गडावरील लोकांची व व्यवसायिकांची बदनामी करणाऱ्या संघटनांची तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT