Kolhapur Flood
पंचगंगेने ओलांडली धोकापातळी  Represintive Image
कोल्हापूर

kolhapur flood update | पंचगंगेने ओलांडली धोका पातळी; कोल्हापूरकरांचा जीव टांगणीला

पुढारी वृत्तसेवा

कसबा बावडा : कोल्हापूर जिल्‍ह्यात सर्वदूर धूमशान सुरू आहे. त्‍यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. आज (दि.२५) सकाळी पंचगंगेची पाणी पातळी ४३ फूट  झाली असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे कोल्हापूरला महापुराचा विळखा बसला आहे. पूरग्रस्त भागातून नागरीकांचे स्थलांतर सुरू असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Kolhapur Flood)

१३ तासात पंचगंगेची पाणी पातळी ५ इंचानी वाढली

पंचगंगा पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाँधार पाऊस सुरू आहे. गेल्या १२ तासात पाणी पातळी ५ इंचाने वाढली. बुधवारी सायंकाळी ७ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ४२ फूट ०७ इंच होती. आज सकाळी ८ वाजता पाणी पातळी ४३ फूटावर पोहोचली आहे. दरम्यान, कसबा बावडा एमआयडीसी-शिरोली (शिये) मार्गावर रस्ते ओढा येथे पाणी आले आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने वाहतूक बंद केली आहे.

राधानगरी धरण ९८.२० टक्के भरले

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण ९८.२० टक्के भरले आहे. धरण ३४७.५० फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरते. सध्या धरणाची पाणी पातळी ३४६.७२ फूट झाली असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अर्धा फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचालित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.

अलमट्टी धरणातून २.४५ लाख क्युसेकने विसर्ग सुरू

अलमट्टी धरणातून आज सकाळी सहा वाजता २ लाख ४५ हजार क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे. सध्या पंचगंगेने धोका पातळी ओलांडली आहे. धरण क्षेत्रात काल रात्री पासून पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरीचा विसर्ग सुरु झाल्यास २०२१ ची परिस्थिती उद्भऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज

संभाव्य पुरस्‍थितीच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या या संत गतीने धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने नदीकाठच्या लोकांची चिंता वाढली असून, त्यांचे स्थलांतर सुरू झालं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्त भागातील कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस जोरदार सुरु असल्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबोहर पडा, तसेच पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

कोल्हापूरकरांचा जीव टांगणीला

कोल्हापूरला आज ऑरेंज अलर्ट 

कोल्हापूरमध्ये गेले काही दिवस पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान मंगळवारी (दि.२३) कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट होता. तर आज (दि.२५) जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

कोल्हापूरला उद्याही ऑरेंज अलर्ट
SCROLL FOR NEXT