कोल्हापूर : पंचगंगेने गुरुवारी धोका पातळी ओलांडल्याने शहराभोवती पुराचा विळखा घट्ट होत आहे. शिवाजी पुलावरून ड्रोनद्वारे टिपलेले पुराच्या वेढ्याचे दृश्य.  Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Flood Update | धोका पातळी ओलांडली ; महापुराचे सावट

रेडेडोह फुटला; 200 गावांचा थेट संपर्क तुटला; 245 कुटुंबांचे स्थलांतर : पातळी 43.3 फुटांवर स्थिर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात तीनच दिवस कोसळलेल्या धुवाँधार पावसामुळे पंचगंगा नदीने गुरुवारी 43 फूट ही इशारा पातळी गाठली. पाणी पातळी दुपारी चारपासून 43 फूट 3 इंचावर स्थिर असून महापुराचे सावट गडद झाले आहे. गुरुवारी रेडेडोह फुटला. शहरात सुतारवाड्यात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. शहरात पुराचे पाणी जगद्गुरू शंकराचार्य मठाकडे जाणार्‍या रस्त्यापर्यंत आले आहे. जिल्ह्यातील 97 मार्ग पाण्याखाली गेल्याने 200 गावांचा थेट संपर्क तुटला असून एसटीच्या 31 फेर्‍याही रद्द कराव्या लागल्या.

पंचगंगेचे पाणी शिवाजी पुलाच्या मच्छाला लागले आहे. मच्छिंद्री होण्यासाठी काही इंच बाकी आहे. रेडेडोह फुटला असून या रस्त्यावर पाणी आले आहे. शहरासह जिल्ह्यात गुरुवारी अधूनमधून हलक्या व मध्यम सरी कोसळत होत्या. सायंकाळनंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. गेल्या 24 तासांत राधानगरी, दूधगंगा, कुंभी, पाटगाव, चित्री, घटप्रभा, जांबरे, सर्फनाला, कोदे या धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. मात्र गेल्या आठ तासांत पावसाचा जोर ओसरला होता.

गुरुवारी राधानगरीचे चार बंद, एक दरवाजा खुला

12.51 वा. राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 7 बंद झाले. सध्या धरणाच्या 6 क्रमांकाच्या दरवाजातून 1428 क्युसेक व बीओटी पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक असा एकूण 2928 क्युसेक विसर्ग सुरू आहे. अन्य सहा दरवाजे बंद झाले आहेत.

या वसाहतीत पुराचा शिरकाव

सुतारवाडा परिसरातील घरे

बापट कॅम्प, मुक्त सैनिक

कदमवाडी-जाधववाडी मार्ग बंद

व्हीनस कॉर्नरच्या पिछाडीस असणार्‍या गॅरेजमध्ये

पंचगंगेने अशी ओलांडली धोका पातळी

(सकाळी सातची पाणी पातळी)

16 ऑगस्ट : 24 फूट 2 इंच

17 ऑगस्ट : 26 फूट 5 इंच

18 ऑगस्ट : 29 फूट 1 इंच

19 ऑगस्ट : 34 फूट 9 इंच

20 ऑगस्ट : 39 फूट 5 इंच

21 ऑगस्ट : 42 फूट 8 इंच

सकाळी 8 वा. : 42 फूट 9 इंच

सकाळी 9 वा. : 42 फूट 11 इंच

सकाळी 10 वा. : 42 फूट 11 इंच

सकाळी 11 वा. : 42 फूट 11 इंच

दुपारी 12 वा. : 43 फूट 0 इंच

दुपारी 1 वा. : 43 फूट 0 इंच (धोका पातळी)

दुपारी 2 वा. : 43 फूट 1 इंच

दुपारी 3 वा. : 43 फूट 2 इंच

संध्याकाळी 4 वा. : 43 फूट 3 इंच

संध्याकाळी 5 वा. : 43 फूट 3 इंच

संध्याकाळी 6 वा. : 43 फूट 3 इंच

संध्याकाळी 7 वा. : 43 फूट 3 इंच

रात्री 8 वा. : 43 फूट 3 इंच

रात्री 9 वा. : 43 फूट 3 इंच

रात्री 10 वा. : 43 फूट 3 इंच

रात्री 11 वा. : 43 फूट 3 इंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT