River Pudhari
कोल्हापूर

Panchganga River | पंचगंगा नदीने गाठला तळ; शिरढोण पुलानजीक पात्र कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे संकट गडद

Panchganga River | शिरढोण पुलानजीक पात्र कोरडे; पाणीटंचाईचे संकट गडद, चिंता वाढली

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : पुढारी वृत्तसेवा
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत असून, शिरढोण पुलानजीक नदीपात्राचा मोठा भाग कोरडा पडला आहे. नदीकाठची उघडी पडलेली जमीन आणि आटत चाललेले पात्र पाहता पाणीटंचाईचे संकट किती गंभीर होऊ शकते, याची जाणीव होत आहे.

कुरुंदवाड, शिरढोण, तेरवाड, हेरवाड आणि अब्दुललाट परिसразील शेती व पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. परिणामी पाणीसाठा घटत असून, आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेतीसाठी नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पिण्याच्या पाण्याची गरजही महत्त्वाची असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची वाट प्रशासन पाहणार का? नदीतील पाणीपातळी घटत असताना संबंधित विभागांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन पाणीवापराचे नियोजन करणे आवश्यक आहे. संभाव्य टंचाई रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास नागरिकांसह शेतकऱ्यांनाही त्याची झळ बसण्याची शक्यता आहे.

वेळिचं उपाययोजना करा

पंचगंगा नदीपात्र कोरडे पडू लागल्याने परिसразील गावांची चिंता वाढली आहे. कुरुंदवाड, शिरढोण, तेरवाड, हेरवाड आणि अब्दुललाट परिसरात पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने सावध होणे गरजेचे आहे. भविष्यत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे. संकट उंबरठ्यावर आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा प्रशासनाने आताच ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT