कोल्हापूर

कोल्हापूर : पंचगंगेला पुन्हा जलपर्णीचा धोका

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  प्रदूषणाच्या नानाविविध कारणांमुळे मरणासन्न दिशेकडे वाटचाल सुरू असलेल्या पंचगंगेभोवती आता जलपर्णीचा विळखा पुन्हा घट्ट होत चालला आहे. शिरोळ, इचलकरंजीनंतर जलपर्णीचा धोका कोल्हापूरच्या वेशीवर आला आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधार्‍याजवळ नदीपात्र मोठ्या प्रमाणात जलपर्णीने व्यापत चालले असून प्रशासनाने वेळीच जलपर्णी हटविण्याची गरज आहे. पंचगंगेच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्यास ऐन उन्हाळ्यामध्ये नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू शकते.

राजाराम बंधार्‍याजवळ पाण्याला दुर्गंधी येत आहे. याशिवाय पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. तसेच गटारीचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने प्रदूषणाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. प्रदूषणामुळे अनेकवेळा मृत माशांचे खच पंचगंगेत तरंगत होते. यामुळे नदीतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तरीदेखील प्रशासनाकडून याकडे कानाडोळा केला जात आहे. प्रदूषणाची तीव—ता आणखी वाढल्यास ऐन उन्हाळ्यात पुन्हा नदीपात्रातील मासे पुन्हा मृत्युमुखी पडण्याचा धोका आहे. याच पाण्याचा पुरवठा नदी काठावरील गावांना होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT