कोल्हापूर : पाण्यातून दुचाकी वाहने काढताना नागरिकांना कसरत करावी लागली.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Overloaded Sugarcane Trolley Accident | ऊस वाहतूक करणारी ओव्हरलोड ट्रॉली उलटली

तोरस्कर चौकात मध्यरात्री थरार : मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया; मोठा अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ऊसाची वाहतूक करणारी भरधाव वेग असलेली आणि ओव्हरलोड ट्रॅक्टर ट्रॉली शहरात सतत गजबजलेल्या जुना बुधवारपेठ- तोरस्कर चौकात उलटली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. अपघातात पाणी पुरवठ्याची मुख्य पाईप पाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. परिसरात पाणीच पाणी झाले होते. तळघरासह परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांना त्याची झळ सोसावी लागली. पोलिस, अग्नीशमन दल, वाहतूक शाखेसह नागरिकांच्या मदतीने युध्दपातळीवर मदत कार्य झाल्याने शनिवारी सकाळी मार्गावरील वाहतूक पुर्ववत झाली.

ओव्हरलोड ट्रॉली रस्त्यावरच मध्यवर्ती चौकात उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत चालक, वाहकासह अन्य कोणाला इजा झाली नाही. मध्यरात्रीला हा थरार घडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र रात्रं-दिवस गजबजलेल्या तोरस्कर चौकातून ऊस वाहतूक करणारी अनेक वाहने धोकादायक आणि भरधाव वेगाने नेली जात आहे. यावर स्थानिक नागरिकांतून संतप्त पडसाद उमटू लागले आहेत. स्थानिक पोलिस, वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागातील पथकांचे या वाहनांवर नियंत्रण नसल्याचा सतप्त सूर परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत होता.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, सतत वर्दळ असलेल्या जुना बुधवार पेठ, तोरस्कर चौकातून मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमाराला ऊस वाहतूक करणारी ओव्हरलोड ट्रॅक्टर ट्रॉली सीपीआर चौकातून शिवाजी पुलाच्या दिशेने भरधाव जात होती. चौकातील वळणाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले. क्षणार्धात ओव्हरलोड ट्रॉली रस्त्यावर उलटली. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. याचवेळी तोरस्कर चौकातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने अवघ्या काही क्षणात सखल भागाला तळ्याचे स्वरूप आले.

दीपक देसाई यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्ष, लक्ष्मीपुरी पोलिस, शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह अग्निशमन दलाशी संपर्क साधला. पथके दाखल झाली. शनिवारी सकाळपर्यंत मदत कार्य सुरू होते. फुटलेली पाईपलाईन पुर्ववत करण्याचेही प्रयत्न सुरू होते. शहर वाहतूक नियंक्षण शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सकाळनंतर मार्गावर वाहतूक पुर्ववत झाल्याचे नंदकुमार मोरे यांनी सांगितले.

पाईपलाईन फुटल्याने अनेक घरांत पाणी

तोरस्कर चौकासह परिसरातील अपार्टमेंटच्या तळघरात शिवाय वस्त्यावरील घराघरांत पाण्याचे लोंढे जाऊ लागले. पार्किंगमधील दुचाकी वाहनांना पाण्याने वेढा दिला. सामाजिक कार्यकर्ते दीपक देसाई, अजय हंडे, राम मेस्त्री, सुनील मेही, प्रदीप चौगुले, नीलेश जाधव, सुशील भांदिगरे यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळांकडे धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT