अकरावी प्रवेश प्रक्रिया  Pudhari File Photo
कोल्हापूर

11th admission process | अकरावीच्या 89 हजार विद्यार्थ्यांकडून अर्ज नोंदणी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी विद्यार्थ्यांची नेट कॅफेवर गर्दी होत आहे. एकाच वेळी ऑनलाईन अर्ज भरल्यामुळे सर्व्हर डाऊनचा फटका विद्यार्थ्यांना बसला होता. तरीही रविवारी 1 लाख 2 हजार 921 पैकी 89 हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात पसंती क्रमाची नोंदणी केली. तर सोमवारी (दि. 25) अर्ज भरण्यासाठी अखेरचा दिवस आहे.

कोल्हापूर विभागात अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा पहिला भाग 1 लाख 2 हजार 921 विद्यार्थ्यांनी भरला आहे. ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हर डाऊनचा फटका विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे राज्य शासनाकडून दोन वेळा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. तांत्रिक अडचणी शासनाकडून दूर केल्यामुळे सर्व्हर डाऊनची अडचण विद्यार्थ्यांना फारशी आली नाही. म्हणूनच रविवारपर्यंत 89 हजार विद्यार्थ्यांनी कोल्हापूर विभागातून प्रवेश निश्चिती केली आहे.

महाविद्यालय अन् उपलब्ध जागा

कोल्हापूर जिल्हा : 291 महाविद्यालये

प्रवेश जागा उपलब्ध : 70 हजार 690

विज्ञान शाखा : 32 हजार 10

वाणिज्य : 16 हजार 330

कला शाखा : 22 हजार 350

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT