कोल्हापूर

शिवाजी पुलावर अपघातात परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरच्या दिशेने भरधाव येणार्‍या टेम्पोने धडक दिल्याने झारखंड येथील परप्रांतीय कामगार जागीच ठार झाला. जस्सीन मंजीर अन्सारी (वय 32, सध्या रा. साळोखे पार्क, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. येथील शिवाजी पुलावर गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जस्सीन अन्सारीसह त्याच्या नातेवाईकाचे दहा वर्षांपासून कोल्हापुरात वास्तव्य आहे. फरशी फिटिंगचा त्यांचा व्यवसाय आहे. गुरुवारी सायंकाळी पन्हाळा येथील काम आटोपून जस्सीन कोल्हापूरकडे येत होता.

शिवाजी पुलावरून चालत जाताना पाठीमागून येणार्‍या टेम्पोने जोरात धडक दिली. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासह करवीर आणि वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT