दैनिक पुढारी आणि पुढारी न्यूजच्‍या वतीने आयोजित टुर्स अँड ट्रॅव्हल्स प्रदर्शनाचे आज उद्घाटन झाले. Pudhari Photo
कोल्हापूर

दै. पुढारी ‘टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शन पर्यटकांसाठी खुले

कोल्हापूरकरांच्या पर्यटनाच्या वाटा सोपा करणारा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : असे म्हटले जाते, की जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा आपण स्वतःला ओळखतो. माणसाचे जीवन समृद्ध करणारी कृती म्हणून आपण पर्यटनाकडे पाहातो. कोल्हापूर आणि परिसरातील दिलखुलास माणसं पर्यटनाच्या बाबतीतही चोखंदळ आहेत. याच कोल्हापूरकरांच्या पर्यटनाच्या वाटा सोपा करणारा, तुमच्या आवडीचा उपक्रम म्हणजे दैनिक पुढारी आणि पुढारी न्यूज आयोजित टुर्स अँड ट्रॅव्हल्स हे प्रदर्शन. हे प्रदर्शन शनिवारपासून पर्यटन प्रेमींसाठी खुले झाले आहे.राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृहात दिनांक १०, ११ आणि १२ हे तीन दिवस सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन खुले असणार आहे. सफर टुर्स अँड ट्रॅव्हल्स प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., सफर टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक रवी शर्मा आणि मुख्य व्यवस्थापक नम्रता घोरपडे, दैनिक पुढारी वृत्तसमूहाचे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील आणि सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट टूर्स ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सूरज नाईक आदींच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनला सुरुवात झाली.

दैनिक पुढारी आणि पुढारी न्यूजच्‍या वतीने आयोजित टुर्स अँड ट्रॅव्हल्स प्रदर्शनाचे आज उद्घाटन झाले.

पर्यटकांच्‍या प्रश्‍नांची उत्तर देणारे प्रदर्शन

प्रवास लांबचा असो किंवा जवळचा, परदेशात असो किंवा आपल्याच देशात या प्रवासाचे कारण काहीही असले तरी आपली इच्छा एकच असते ती म्हणजे हा प्रवास आनंददायी आणि विनाअडथळा झाला पाहिजे. कारण शेवटी एका अनोखळी ठिकाणी जायचे म्हटले तरी थोडी भीतीही मनात असतेच. सहलीचे प्लॅनिंग, डेस्टिनेशन्सची माहिती, ट्रिपला जाण्यासाठी फायनान्स मिळणार का, राहायचे कोठे, व्हिसाच्या अटी काय आहेत, ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा घ्यायचा, असे प्रश्न आपल्या मनात असतात, या सर्वांचे उत्तर आपल्याला मिळते टुर्स अँड ट्रॅव्हल्स या प्रदर्शनात. त्यामुळे ट्रॅव्हल्सचा कोणताही प्लॅन करण्यापूर्वी कोल्हापूरकर दैनिक पुढारी आणि पुढारी न्यूज आयोजित टुर्स अँड ट्रॅव्हल्स या प्रदर्शनाला आवश्य भेट देतात.

यंदाच्या प्रदर्शनात सफर टुर्स अँड ट्रॅव्हल्स, गगन ट्रॅव्हल्स, मिरॅकल हॉलिडे, केंद्र सरकारचे पर्यटन मंत्रायल, राही टुर्स अँड ट्रॅव्हल्स, क्वेस्ट टूर्स, मेक माय ट्रिप हॉलिडे, अमेझिंग, भटकंती ट्रॅव्हल्स, चौधरी यात्रा कंपनी, हेवन हॉलिडे, थॉमस कुक, गिरीकंद हॉलिडे, सिद्धीविनायक टुर्स, डेस्टिनी टुर्स, विश्रांती टुर्स, ड्रिम व्हिजन, एस. ओ. टी. सी., पार्थ, व्हिक्टोरिया व्हेकेशन्स, विश्व हॉलिडेज, काळे बजाज, EatRaEat, मिरजकर टुर्स अँड ट्रॅव्हल्स या नामवंत संस्था सहभागी झालेल्या आहेत. या सहभागी संस्था त्यांचे Best of the Best ट्रॅव्हल प्लॅन्स आणि इतर ऑफर्स या प्रदर्शनात सादर करणार आहेत. त्यामुळे सहकुटुंब, मित्रपरिवारासह या प्रदर्शनाला भेट द्या आणि तुमची ट्रीप नक्की करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT