Online Cricket Betting | इचलकरंजीतून 104 संगणक संच जप्त 
कोल्हापूर

Online Cricket Betting | इचलकरंजीतून 104 संगणक संच जप्त

पोलिसही चक्रावले; ‘सायबर’कडून होणार तपास

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : ऑनलाईन क्रिकेट बेटिंग प्रकरणाच्या तपासात पोलिसांना मोठे आणि धक्कादायक धागेदोरे हाती लागले आहेत. गुरुवारी मुख्य सूत्रधार अमेय बडवे याच्या गोदामातून सुमारे 26.28 लाखांचे 104 संगणक संच, की-बोर्ड, सीपीयू आदींसह 4 मोबाईल, असे साहित्य जप्त करण्यात आले. टेम्पोभरून संगणक पोलिस ठाण्यात आणल्याने त्याची शहरात जोरदार चर्चा रंगली होती. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या या साठ्यामुळे तपास यंत्रणाही काही क्षणासाठी चक्रावून गेली होती.

जप्त करण्यात आलेले संगणक हे नवीन आहेत. आयपीएल सामना संपल्यानंतर पुन्हा नव्याने व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हे संगणक आणण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. याची सविस्तर माहिती अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी दिली. या कारवाईमुळे सट्टा रॅकेट केवळ मोबाईल किंवा छोटे डिजिटल व्यवहारापुरते मर्यादित नसून ते पूर्णतः तांत्रिक पायाभूत सुविधांवर चालणारे संघटित नेटवर्क असल्याचे उघडकीस आले आहे.

इचलकरंजी : बेटिंगप्रकरणी अटक केलेला संशयित नगरसेवक नितेश पोवारसह अन्य संशयित. (छाया : छोटूसिंग)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT