Shinganapur road accident | शिंगणापूर रस्त्यावर भरधाव कारने उडविल्याने एकाचा मृत्यू; 2 जखमी Pudhari
कोल्हापूर

Shinganapur road accident | शिंगणापूर रस्त्यावर भरधाव कारने उडविल्याने एकाचा मृत्यू; 2 जखमी

संतप्त नागरिकांनी कार फोडली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिंगणापूर रस्त्यावर बुधवारी रात्री उशिरा भरधाव कारने धडक दिल्याने एकाचा मृत्यू व दोघे जखमी झाले. विशाल विजय शिंदे (वय 40, रा. शिंगणापूर, मूळ गाव वडगाव) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कार फोडली.

चालकाने मद्यपान केले असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. विशाल शिंदे एका डेअरीमध्ये काम करत होते. काम संपल्यानंतर चालत ते घरी जात होते. मातोश्री वृद्धाश्रमच्या पुढील कॉर्नरवर मागून येणार्‍या भरधाव कारने धडक दिल्याने ते रस्त्याच्या कडेला पडले. कारने आणखी दोघांना धडक दिल्याचे समजते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडी अडवून फोडली. त्यानंतर विशाल शिंदे याला उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले. उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सीपीआरमधून सांगण्यात आले. यावेळी सीपीआरमध्ये शिंदे यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, अपघातातील कार ताब्यात घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT