कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कृष्णा कलकुटगी यास ताब्यात घेऊन गावठी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतुसे हस्तगत केली.  Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : शस्त्र तस्करीप्रकरणी खुपिरेतील एकास अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दोनवडे फाटा-साबळेवाडी रोडवर विटभट्टीजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शस्त्र विक्रीसाठी आलेल्या संशयिताला ताब्यात घेऊन गावठी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंत काडतुसे हस्तगत केली. कृष्णा सुरेश कलकुटगी ( वय 38, रा. खुपिरे, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी कारवाई करण्यात आली.

संशयिताने गावठी बनावटीचे पिस्टल कोठून व कोणासाठी आणले, याची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. यापूर्वी शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यात संशयिताचा सहभाग होता का, याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस निरीक्षक कळमकर, सहायक निरीक्षक चेतन मसुटगे, संतोष बरगे, कृष्णात पिंगळे, नामदेव यादव यांच्या पथकाने दोनवडे फाटा- साबळेवाडी रोडवरील विटभट्टीजवळ कलकुटगीला ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्याकडे पिस्टल, जिवंत काडतुसे आढळून आली. संशयिताविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT