कसबा बावडा : पंचगंगा पाणलोट क्षेत्रामध्ये धुंवाधार पाऊस सुरु आहे. गेल्या १२ तासात पाणी पातळी १ फूट ४ इंचाने वाढली. गुरुवारी सायंकाळी ९ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ४३ फूट ६ इंच होती. शुक्रवारी सकाळी ९ वाजता पाणी पातळी ४४ फूट १० इंचावर पोहोचली आहे. सकाळपासून एका तासाला तीन इंच पाणी वाढत असल्याचे समजते.
कसबा बावडा एमआयडीसी-शिरोली (शिये) मार्गावर तस्ते ओढा येथे रस्त्यावर पाणी आले आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने वाहतूक बंद केली आहे.