कोल्हापूर : भाजप-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देताना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचे पदाधिकारी. शेजारी डॉ. स्मिता योगेश जाधव व इतर.  
कोल्हापूर

Kolhapur | जुनी पेन्शन समन्वय संघाचा कौस्तुभ गावडे यांना जाहीर पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजप-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने पाठिंबा जाहीर केला. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी पाठिंबा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, खा. धैर्यशील पाटील, आ. निरंजन डावखरे, भीमराव तापकीर, संजय जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाठिंब्याची घोषणा केली. नागपूरहून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी गावडे हे केवळ पुणे विभागापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील जुनी पेन्शनच्या प्रश्नासाठी नेतृत्व करू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.

गावडे म्हणाले, शिक्षक आणि कर्मचारी यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला ही आनंदाची बाब असून मोठी जबाबदारी आहे. शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनस्तरावर संवाद साधून प्रभावी पाठपुरावा करू. याप्रसंगी सुभाष माने, तानाजी माने, नंदकुमार सागर, प्रसाद गायकवाड, संजयकुमार झांबरे, सचिन नलवडे, दत्ता पाटील, बाबा पाटील, संदेश राऊत, विजय येवले, सुधाकर जगदाळे, शशिकांत शिंदे, रामचंद्र मोहिते, भरत मोजर, देविदास कठाळे, दत्तात्रय घुगरे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT