कोल्हापूर : श्री शाहू विजयी गंगावेस तालमीच्या भेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गदा, शाल व श्रीफळ देऊन कुस्तीप्रेमींच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. 
कोल्हापूर

अजित बोलतोय, कोल्हापुरात आलोय, 10 वाजता बैठकीला या!

दोन वर्षांपूर्वी गंगावेस तालमीच्या भेटीवेळी फोनवरून अधिकार्‍यांना फोडला होता घाम

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘अजित बोलतोय, मी कोल्हापुरात आलो आहे. 10 वाजता बैठकीला या,’ फोनवरून असे बोलत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विभागांच्या अधिकार्‍यांना ऐन हिवाळ्यात अक्षरश: घाम फोडला होता.

दोन वर्षांपूर्वी 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी साडेसात वाजता, ते श्री शाहू विजयी गंगावेस तालमीत दाखल झाले होते. तालमीची पाहणी करून त्यानंतर तालमीच्या विकासा संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी तातडीने संवाद साधला होता. कुस्तीचे आश्रयदाते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या श्री शाहू विजयी गंगावेस तालमीला सर्वोत्कृष्ट तालीम बनवणार असल्याची घोषणा पवार यांनी त्यावेळी केली होती. तसेच 200 मल्लांसाठी वसतिगृह, मॅटसह विविध अत्याधुनिक सुविधांसह सर्वसमावेशक आराखडा सादर करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. यानंतर मल्ल व वस्तादांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

गदा देऊन सन्मान

तालमीच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी राजर्षी शाहूंचा पुतळा, चांदीची गदा, शाल-श्रीफळ देऊन विशेष गौरव केला होता. सत्काराला उत्तर देताना पवार यांनी, राजर्षी शाहूंनी निर्माण केलेली कुस्तीची परंपरा कायम राहण्यासाठी तालमींमध्ये वस्ताद व मल्लांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणार, गंगावेस तालमीच्या विकासासाठी तज्ज्ञ आर्किटेक्ट, महापालिका, साबांवि, क्रीडा विभागाकडून योजनांची जोड देऊन परिपूर्ण आराखडा करून त्यानुसार निधीची उपलब्धताही करू दिली. सद्या तालीम विकासाचे हे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT