कोल्हापूर

Kolhapur News: अघोरी पूजा करणाऱ्या मांत्रिकांना पोलिसांनी शिरोलीत फिरवले

दोघांना पुन्हा एक दिवसाची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करणाऱ्या मांत्रिक किशोर लोहार व अभिजित बाबासो मोहिते या दोघांना शिरोली पोलिसांनी शुक्रवारी तपासाचा भाग म्हणून गावातून फिरवले. दरम्यान, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

गेली 15 दिवसांपासून फरार असणारा मांत्रिक किशोर लोहार व व्हिडीओ चित्रीकरण करणारा अभिजित मोहिते यास गुरुवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांच्याकडून अन्य काही माहिती मिळते का पाहण्यासाठी शुक्रवारी त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर लोहार व मोहिते यांना तपासाचा भाग म्हणून गावातून फिरवत अशाप्रकारे कोणताही प्रकार करणाऱ्याची गय केली जाणार नाही, असा संदेश शिरोली पोलिसांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT