Nrusinhwadi Ghat | दिव्यांनी उजळला नृसिंहवाडीचा घाट 
कोल्हापूर

Nrusinhwadi Ghat | दिव्यांनी उजळला नृसिंहवाडीचा घाट

कार्तिक स्नानासाठी भाविकांची मांदियाळी

पुढारी वृत्तसेवा

कवठेगुलंद : भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक पर्व मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. कृष्णा नदीच्या घाटावर हजारो दिव्यांची आरास करण्यात आली होती. या दीपोत्सवामुळे संपूर्ण नदीघाट परिसर प्रकाशाने उजळून निघाला. कार्तिक स्नानासाठी पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी जमली होती. हजारो भाविकांनी कृष्णा नदीत स्नान करून श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरासमोरील कृष्णा नदीघाटावर दीपप्रज्वलन करण्यात आले. हजारो दिव्यांच्या लखलखाटाने घाटाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. दीपांच्या प्रकाशात उजळलेला नदीघाट आणि परिसरात सुरू असलेला दत्तनामाचा जयघोष यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. या नयनरम्य दीपोत्सवाचा आनंद भाविकांनी मनमुराद लुटला.

दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. काकड आरती, महापूजा, धूपारती तसेच श्री दत्त महाराजांचा पालखी सोहळा भक्तिभावाने पार पडला. या सर्व धार्मिक कार्यक्रमांत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मंदिर परिसरात भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT