कोल्हापूर

Guru Purnima | नृसिंहवाडीत गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी भक्ताची मांदियाळी दाखल!

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथे उद्या बुधवारी २९ जुलै होणाऱ्या गुरुपौर्णिमा सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. श्री दत्तप्रभूंच्या चरणी लीन होण्यासाठी राज्यभरातून तसेच इतर राज्यांमधूनही लाखो भाविकांची मांदियाळी नृसिंहवाडीत दाखल झाली आहे. संपूर्ण परिसर नामस्मरणाच्या अखंड गजराने दुमदुमून गेला आहे.

दत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुपूजनाचा विशेष सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देवस्थान समिती व ग्रामपंचायतीने दर्शन रांगा, वाहतूक व्यवस्था, आपत्कालीन सुविधा आणि निवाऱ्याची चोख व्यवस्था केली आहे. कृष्णा, पंचगंगेच्या पवित्र संगमावर स्नानासाठीही भाविकांची वर्दळ आहे.

भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कुरुंदवाड आगाराने विशेष खबरदारी घेतली आहे. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी आणि मिरज मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन आहे. अनेक ठिकाणी तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारण्यात आली असून, डॉक्टरांचे विशेष पथक आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

...असे आहे नियोजन

शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे. मुख्य मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. दर्शनासाठी एकूण ४ रांगांचे नियोजन आहे. बहुमजली पार्किंग भरल्यानंतर माहेश्वरी भवन, पाटील महाराज मठ, जगदाळे प्लॉट, कॉलेज परिसर येथे वाहनतळ व्यवस्था आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT