कोल्हापूर

आता लगबग पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमांची!

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : रायगडावरील 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपतो ना संपतो तोच शिवभक्त-इतिहासप्रेमींना वेध लागतात पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे. संपूर्ण जुलै महिन्यात विविध संघटनांच्या वतीने या मोहिमेचे आयोजन केले जाते. यात देश-विदेशातून साहसवीर मोठ्या संख्येने सहभागी होतात. याची जय्यत तयारी विविध संसघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

शिवकाळात दि. 12 व 13 जुलै 1660 रोजी पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावर प्रचंड रणकंदण घडले. रयतेच्या स्वराज्याच्या रक्षणार्थ शिवछत्रपतींच्या नेतृत्वाखाली अनेक ज्ञात-अज्ञात मावळे प्राणपणाने लढले. अनेकांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. अशा या स्फूर्तिदायी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पन्हाळगड ते पावनखिंड या साहसी पदभ—मंती मोहिमेचे आयोजन केले जाते.

शिवछत्रपतींच्या रक्षणासाठी नरवीर शिवा काशीद, वीर बाजीप्रभू- फुलाजी प्रभू, विठोजी काटे, संभाजी जाधव यांसह अनेक ज्ञात-अज्ञात मावळ्यांनी पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावर आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या या हौतात्म्यास अभिवादन करण्यासाठी आणि शिवछत्रपतींच्या चरित्रातील या अविस्मरणीय घटनेच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी हजारो आबालवृद्ध मावळे व रणरागिणी या मोहिमेत सहभागी होत असतात.

प्रमुख संस्थांच्या नियोजित मोहिमा अशा…

  • सह्याद्री प्रतिष्ठान : 12 व 13 जुलै निसर्गवेध परिवार : 21 व 22 जुलै
  • आनंदराव पोवार संस्था : 13 व 14 जुलै
  • हिल रायडर्स ग्रुप : 6 व 7 जुलै, 20 व 21 जुलै / 27 व 28 जुलै
  • शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्र : 20, 21, 22 जुलै
  • मैत्रेय प्रतिष्ठान : 20 जुलै (एक दिवसीय)
  • कोल्हापूर मर्दानी खेळ : 20 व 21 जुलै
  • इचलकरंजी गिरीभ्रमण संघटना : 20 व 21 जुलै
  • कोल्हापूर हायकर्स : 13 व 14 जुलै

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT