कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात असणार्या अनेक उमेदवारांना नोटा मताचा तोटा सहन करावा लागला. यामुळे 71 जागांपैकी तब्बल 17 जणांना अगदी थोड्या मतांनी पराभव पत्करावा लागला. यात काँग्रेसच्या सरोज सरनाईक, प्रेमा डवरी, दीपा मगदूम, भाजपचे राहुल चिकोड यांचा समावेश आहे.
यंदाच्या निवडणुकीत प्रथमच झालेल्या चार प्रभाग रचनेमुळे अनेक प्रकारचा गोंधळ उडाला. यामुळे राजकीय पक्षांसह उमेदवारांनी बांधलेली गणिते चुकली. मतदान प्रक्रियेतील ‘नोटा’ आणि अपक्ष उमेदवारांनीही अनेकांना पराभवाचा धक्का दिला. अनेक उमेदवारांनी फेर मोजणीही करून घेतली. पण त्यातही निकाल ‘जैसे थे’च राहिला.
काँग्रेसच्या सरोज सरनाईक केवळ 16 मतांनी पराभूत झाल्या. तेथे ‘नोटा’ला 325 मते मिळाली. दीपा दिलीप मगदूम यांचा अवघ्या 163 मतांनी पराभव झाला. नोटाला तेथे 355 मते मिळाली. प्रेमा डवरी या 192 मतांनी पराभूत झाल्या. तेथे 201 मते ‘नोटा’ला मिळाली. प्रकाश नाईकनवरे यांना 98 मते कमी पडली, तेथे तब्बल 371 मते नोटाला मिळाली. त्याशिवाय इतर 14 ठिकाणी अपक्षांमुळे दिग्गजांना विजयी गुलालापासून वंचित राहावे लागले.
नोटाच्या मताचा फटका बसलेले उमेदवार असे...
कंसात पराभवाची मते / नोटाला मिळालेली मते - प्रकाश नाईकनवरे (98/371), राहुल चिकोडे (41 / 290), विलास वास्कर (332/441), हेमंत कांदेकर (363/229), राहुल इंगवले (713/358), दीपा मगदूम (163/ 355), दीपक कांबळे (538 / 353), मनाली पाटील (405/ 496), सरोज सरनाईक (16 / 325), तनिष्का सावंत (491/379), यशोदा आवळे (257 / 304), प्रेमा डवरी (199 / 901), अश्विनी कदम (281 / 217), अपर्णा पोवार (299 / 384), शुभांगी पोवार (675 / 520), रेणू माने (546 / 427), सुषमा जाधव (293 / 733).