गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये साऊंड सिस्टीम लावून ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणखी दहा सिस्टीम चालक, मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी उचगाव येथे 18 सिस्टीम चालक मालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कै. अजित कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ (सत्या ग्रुप), स्वराज्य मित्र मंडळ, भाजी मंडई, शिवशक्ती स्पोर्टस्, मंगेश्वर कॉलनी, पंचरत्न तालीम मंडळ, जैन कदम गल्ली, शिवशक्ती तरुण मंडळ, यादववाडी, सम्राट तरुण मंडळ, बाबानगर, एबीएस तालीम, शेवट बस स्टॉप, लेटस क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (लेटस ग्रुप), संयुक्त मंगेश्वर गल्ली, एक्स बॉईज, आंबेडकर चौक. या मंडळांसमोर साऊंड सिस्टीम चालविणार्या आशिष जयपाल सूर्यवंशी (रा. आळते, ता. हातकणंगले), सिद्धार्थ रामचंद्र भोसले (रा. कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा), उमेश कुंडलिक वाईंगडे (रा. उचगाव), वैभव माणकेश्वर धुरुपे (रा. स्वामी व्यंकटेश सोसायटी, न्यू सांगवी, पुणे), सचिन आनंदा जोंधळे (रा. बाचणी, ता. कागल), अक्षय तानाजी मोरे (रा. नेर्ले, ता. करवीर), प्रबुद्ध महेंद्र निकाळगे (रा. फलटण, जि. सातारा), फैय्याज धवल मकानदार (रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड, जि. सातारा), ओंकार माणिक राजपूत (रा. देशमुख गल्ली, सातारा), रितेश राजेश पाटील (रा. 100 फुटी रोड, सांगली) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची फिर्याद सतीश दिलीप माने (पोलिस हेड कॉन्स्टेबल, गांधीनगर) यांनी दिली आहे.