Keshavrao Bhosale Natyagruha | केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाहीच : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड 
कोल्हापूर

Keshavrao Bhosale Natyagruha | केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाहीच : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड

प्रशासनाच्‍या लेखी भूमिकेनंतर रंगकर्मींचे आंदोलन स्थगित

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण होणार नसून, मालकी आणि अंतिम नियंत्रण कोल्हापूर महापालिकेकडेच राहील, अशी स्पष्ट ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी रंगकर्मींसोबत झालेल्या बैठकीत दिली.

गेल्या काही दिवसांपासून नाट्यगृहाच्या बाह्य व्यवस्थापनाच्या प्रस्तावावरून रंगकर्मी, शाहूप्रेमी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र आंदोलन छेडले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने लेखी पत्र देत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान रंगकर्मींच्या मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती रंगकर्मी संघटनेच्या वतीने देण्यात आली. यावेळी रंगकर्मी किरणसिंह चव्हाण, आनंद काळे, प्रसाद जमदग्नी, सुनील घोरपडे, रोहन घोरपडे यांनी प्रस्ताव सादर केला.

निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. मात्र संपूर्ण नियंत्रण महापालिकेचेच राहणार आहे. कार्यक्रमांचे दर, निविदेचा मसुदा आणि इतर अटींबाबत ९ ऑगस्टनंतर महापौर, पदाधिकारी आणि रंगकर्मी यांच्यासमवेत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

व्यवस्थापन द्या, पण मालकी नाही

मालकी, अंतिम नियंत्रण महापालिकेकडेच राहावे, केवळ दैनंदिन व्यवस्थापन पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे पात्र व अनुभवी संस्थेकडे सोपवावे, परवडणारे व वाजवी भाडे दर निश्चित करावेत, दरवर्षी स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे, केशवराव भोसले नाट्यगृहाचा सांस्कृतिक वारसा, उद्देश आणि सार्वजनिक स्वरूप अबाधित ठेवण्याची हमी द्यावी, अशा प्रमुख मागण्या रंगकर्मींनी केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT