कोल्हापूर

व्हीनस कॉर्नर राडा, सीपीआर तोडफोडप्रकरणी नऊजणांना अटक

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील व्हीनस कॉर्नर चौकात वाहने पार्किंग करण्याच्या कारणावरून हॉटेल मालक आणि हातगाडी चालक यांच्यातील वादावादीनंतर झालेला राडा आणि सीपीआर रुग्णालयाच्या तोडफोड प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आठजणांना तर चाकू हल्लाप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकाला अटक केली.

आकाश वर्णे (रा. उत्तरेश्वर पेठ) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे; तर अन्य आठजणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी सीपीआर तोडफोड प्रकरणात अटक केली. त्यामध्ये अक्षय रवींद्र आळवेकर (34, डी वॉर्ड, गुरुवार पेठ), ऋषीकेश उत्तम निगवेकर (34, धोत्री गल्ली, गंगावेश), अनिकेत विद्याधर पाटील (31, रा. दुधाळी), शेखर शामराव साळोखे, 32, रा. रजपूत गल्ली, उत्तरेश्वर पेठ), सत्यम संजय काळे (25, रा. स्वामी गल्ली, जाधववाडी), सुरज दयानंद कांबळे (20, कनाननगर), नितीन मंगेश कांबळे (21, म्हालसवडे, ता. शाहूवाडी) मंगेश बाळासो मोरे (39, उत्तरेश्वर पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बुधवारी मध्यरात्री व्हीनस कॉर्नर येथे राडा झाला होता. जखमींना उपचारासाठी दाखल केले असतानाही यातील संशयितांनी रुग्णालयात हाणामारी केली. रुग्णालयाच्या इमारतीवर दगडफेक करणे, साहित्याची मोडतोड करून वैद्यकीय उपचार करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी यासंदर्भात कडक कारवाईचे धोरण अवलंबून यातील संशयितांना शुक्रवारी अटक केली. या प्रकरणाचा तपास लक्ष्मीपुरी पोलिस करत आहे.

SCROLL FOR NEXT