कोल्हापूर : पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्रामध्ये सापडलेली शिंगळ्या (कॅटफिश) माशाची नवी प्रजात. 
कोल्हापूर

Sahyadri fish species | सह्याद्रीच्या कुशीत माशाच्या नव्या जातीचा शोध

स्वतंत्र संशोधक आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्रामध्ये शिंगळ्या (कॅटफिश) माशाच्या नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. हा मासा उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळतो. अशा प्रवाहांच्या तळाशी वाळू, गोटे आणि दगड यांच्या मिश्रणात या माशाला लपण्यासाठी व अन्न शोधण्यासाठी योग्य सूक्ष्म अधिवास microhabitat) उपलब्ध होतात. या संशोधनात स्वतंत्र संशोधक बालाजी विजयकृष्णन व ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे व अभिषेक शिर्के यांचा सहभाग आहे.

नव्याने शोधलेल्या माशाचा समावेश अम्लीसेप्स या कुळामध्ये केला असून याचे नामकरण ‘अम्लीसेप्स वायव्य’ असे करण्यात आले आहे. कोंकणी आणि मराठी भाषेत ‘वायव्य’ (उत्तर-पश्चिम) असा अर्थ होतो, जो या प्रजातीच्या उत्तर-पश्चिम घाटातील वास्तव्याच्या संदर्भाने देण्यात आला आहे.

प्रदूषणाचा जलपरिसंस्थांना धोका

या प्रजातीची नोंद सध्या गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधील काही मर्यादित ठिकाणांवरूनच झाली आहे. प्रजातीची संख्या खूपच कमी आणि विखुरलेली असल्याचे या भागांतील ओढे आणि प्रवाह यांसारख्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. अशा संवेदनशील अधिवासांचे जतन केल्यास केवळ या प्रजातीचेच नव्हे तर गोड्या पाण्यातील इतर अनेक माशांच्या प्रजातींचेही संरक्षण होऊ शकते. मात्र खाणकाम, औद्योगिक सांडपाण्याचा निचरा, मायक्रोप्लास्टिकचे प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे सोडल्या गेलेल्या माशांच्या परकीय प्रजाती अशा घटकांमुळे जलपरिसंस्थांवर धोका निर्माण होत आहे.

माशाची वैशिष्ट्ये...

दुभंगलेली शेपटी (लर्रीवरश्र षळप), अपूर्ण मध्यरेषा (lateral line), शेपटीच्या मध्यभागी असणार्‍या शिरांमध्ये आकड्यासारख्या (centrally projecting hooks) रचनेचा अभाव, तसेच शेपटीच्या dorsal procurrent भागाशी एकरूप न होता स्पष्टपणे वेगळी असलेली adipose fin ची रचना या माशाला त्याच्या कुळातील इतर प्रजातींपासून वेगळी ओळख देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT