कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी शहर, जिल्ह्यात पाच वर्षांत दाखल झालेले गुन्हे, संशयितांवर झालेल्या कारवाईबाबत आढावा घेऊन रॅकेट उद्ध्वस्त करण्यात येईल, असे नूतन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले.
नीलोत्पल यांनी प्रभारी पोलिस अधीक्षक तथा अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांच्याकडून सोमवारी पदभार स्वीकारला. यावेळी डॉ. बच्चू, पोलिस उपअधीक्षक ( गृह) तानाजी सावंत यांनी नीलोत्पल यांचे स्वागत केले. यावेळी नीलोत्पल म्हणाले, स्त्री भ—ूण हत्येच्या घटना खपवून घेणार नाही. कठोर कारवाईच्या आधारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात येईल. कोल्हापूर जिल्ह्यात पाच वर्षांतील दाखल गुन्ह्यांसह संशयित टोळ्यांवरील कारवाईबाबत आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.