कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य हौशी ६० व्या मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून ‘नेटवर्क २४/७’ प्रथम

backup backup

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून मेरीड (इंडिया) कोल्हापूर, या संस्थेच्या 'नेटवर्क २४/७' या नाटकाला प्रथम तसेच शिवाजी विद्यापीठ संगीत व नाटयशास्त्र विभाग, कोल्हापूर या संस्थेच्या अंधायुग या नाटकास द्वितीय पारितोषिक पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. युवक मित्र मंडळ, कोल्हापूर या संस्थेच्या 'गगन दमामा बाज्यो' या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

२३ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२२ या कालावधीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सर्वश्री देवीदास आमोणकर, राजेंद्र पाटणकर आणि सुहास खंडारे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे कोल्हापूर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे

  • दिग्दर्शन
  • प्रथम पारितोषिक विद्यासागर अध्यापक (नाटक नेटवर्क २४/७)
  • द्वितीय पारितोषिक ज्ञानेश मुळे (नाटक- अंधायुग)
  • प्रकाश योजना प्रथम पारितोषिक आशिष भागवत (नाटक नेटवर्क २४/७)
  • द्वितीय पारितोषिक संजय तोडकर (नाटक अंधायुग),
  • नेपथ्य प्रथम पारितोषिक प्रकाश पाटील (नाटक-नेटवर्क २४/७),
  • द्वितीय पारितोषिक ओंकार पाटील (नाटक अंधायुग)
  • रंगभूषा
  •  प्रथम पारितोषिक ओंकार पाटील (नाटक-अंधायुग),
  • द्वितीय पारितोषिक विजयालक्ष्मी कुंभार (नाटक- गगन दमामा बाज्यो)
  • उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक
  •  अजय इंगवले (नाटक अंधायुग) व आदिती देशपांडे (नाटक- कातळडोह)
  • अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे
  • प्रणवी पाटील (नाटक-चांगुणा),
  • मीना पोतदार ताशिलदार (नाटक- नॉर्थ पोल साऊथ पोल),
  • उज्वला खांडेकर (नाटक नेटवर्क २४/७)
  • आसावरी नागवेकर (नाटक- उत्तररामचरित)
  • रितीक राजे (नाटक-सुलतान रजिया)
  • सुबोध गद्रे (नाटक- स.न.वि.वि.)
  • सतीश तांदळे (नाटक- गगन दमामा बाज्यो)
  • राजन जोशी (नाटक नेटवर्क २४/७)
  • प्रसाद जयदग्नी (नाटक- नॉर्थ पोल साऊथ पोल)
  • आदित्य कुंभार (नाटक- कातळडोह)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT