कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर स्पोर्टस् क्लब, रग्गेडीयन क्लब आयोजित व दै. 'पुढारी' असोसिएट स्पॉन्सर असलेल्या 'कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन'चे आयोजन यंदा दि. 24 एप्रिल रोजी केले आहे. 'माझे शहर, माझी मॅरेथॉन' हे यंदाच्या मॅरेथॉनचे बि—द आहे. यात देश-विदेशातील सुमारे 5 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.
5 कि. मी., 10 कि. मी., 21 कि. मी., 42 कि. मी., 50 कि. मी. अशा पाच गटांत आणि 18 वर्षांच्या आतील व 18 ते 34, 35 ते 40, 41 ते 65 व पुढे 65 वर्षांवरील महिला व पुरुष गटात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत नावनोंदणी करणार्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल, नाष्टा, सर्टिफिकेट, गुडी बॅग, रेसचे फोटो, टाईम चिप आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.
मुख्य प्रायोजक 'वायु डाइनटेक अॅप व एस. जे. आर. टायर' हे आहेत तर दैनिक 'पुढारी' असोसिएट पार्टनर आहेत. सहप्रायोजक – ब्लोमिंग बड्स पब्लिक स्कूल, एचपी हॉस्पिटॅलिटी, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर टुरिझम, जे. के. ग्रुप आदी आहेत. टोमॅटो एफ. एम. रेडिओ पार्टनर तर बी. न्यूज मीडिया पार्टनर आहेत. सहभागी होणार्यांनी नाव नोंदणीसाठी रग्गेड कब किड्स फिटनेस अकॅडमी, तावडे लॉन – मेमोरियल चर्चच्या मागे, सासने ग्राऊंड येथे दुपारी 4 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी www.kolhapurrun.com या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा 7776981548 व 7722067477 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे, आवाहन संयोजकांनी केले आहे.
मुलांमध्ये शिक्षणाबरोबर खेळाची आवड निर्माण होण्यासाठी प्रतिवर्षी होणार्या मॅरेथॉनमध्ये आमच्या शाळेचे शिक्षक विद्यार्थी व पालक सहभागी होतात. फिटनेससाठी ही मॅरेथॉन महत्त्वाची आहे.
– रेश्मा महाडिक, संस्थापिका ब्लोमिंग बर्डस् पब्लिक स्कूलहॉटेल व्यवसाय सांभाळत आम्ही आमच्या सर्व कर्मचार्यासोबत मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतो. यामुळे कर्मचारी एक दिवस का होईना खेळाचा मनसोक्त आनंद लुटत धमाल मस्ती करतात.
– हिराकांत पाटील,