हसन मुश्रीफ File Photo
कोल्हापूर

Hasan Mushrif | निवडणुकीच्या अखेरच्या दिवसापर्यंत लढू : मुश्रीफ

पात्र संस्थेला मतदान अधिकार मिळवून देऊ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘गोकुळ’ला दूध पुरवठा करणाऱ्या, नोंदणीकृत प्रत्येक दूध संस्थेला मतदानाचा अधिकार मिळवून देऊ, त्याकरीता निवडणुकीच्या आदल्यादिवसापर्यंत लढा देऊ, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांसमोर सोमवारी व्यक्त केली.

प्रशासक मंडळाने धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत

गोकुळच्या प्रशासक मंडळाने नवीन संचालक मंडळ निवडून येईपर्यंत केवळ नियमित कारभार पाहावा. कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, असे मत मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

ठेकेदारांच्या अधिवेशनात आमदारांवर करण्यात आलेल्या दहा टक्के कमिशनच्या आरोपावर मुश्रीफ म्हणाले, माझ्या तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एक टक्काही कमिशन घेतलेले नाही. त्यामुळे ठेकेदारांनी सरसकट आरोप करू नयेत, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील संस्थांचे ठराव शक्तिप्रदर्शनाने २५ जूनला दाखल करणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील संस्थाचे ठराव २५ जूनला दाखल केले जाणार आहेत.त्यासाठी सर्व ठरावधारक पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते महासैनिक दरबार येथे एकत्रित येऊन त्यानंतर शक्तिप्रदर्शनाने ठराव दाखल करणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, राजेश पाटील, राहुल पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदींसह प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT