Kagal victory: कागलमधील विजयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी घेतली भेट Pudhari
कोल्हापूर

Kagal victory: कागलमधील विजयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या युतीने सहा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समिती मतदारसंघांमध्ये घवघवीत विजय मिळवले

पुढारी वृत्तसेवा

कागल : कागल तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेास व भारतीय जनता पक्षाच्या युतीने सहा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समिती मतदारसंघांमध्ये घवघवीत विजय मिळवले. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत आभार मानले.

फडणवीस यांच्या पुढाकारातून मंत्री हसन मुश्रीफ, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे व माजी आमदार संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या युतीने कागल विधानसभा मतदारसंघात विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. संघर्षाऐवजी समन्वय व समझोत्यातून जनतेच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कागल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप-राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासह विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT