पालकमंत्री हसन मुश्रीफ Pudhari File Photo
कोल्हापूर

मंत्रिपद न मिळाल्याने सतेज पाटील यांना दु:ख

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मंत्रिपद न मिळाल्याने दुःखी झालेले आ. सतेज पाटील यांचा लवकरच भ्रमनिरास होईल, असा टोला लगावत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात महायुतीच सत्तेवर येईल, असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. विभागीय क्रीडा संकुल येथे अंतराराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत अ‍ॅकॅडमीला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली.

यावेळी माध्यमांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा येतील, हा सतेज पाटील यांचा भ्रम आहे. आ. पाटील यांना मंत्रिपद न मिळाल्याचे दुःख अजूनही आहे. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीलाच यश मिळणार आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांना सन्मानपूर्वक जागा देण्यात येणार असल्यामुळे जागा वाटपाबाबत कोणताही वाद नाही. इच्छुक कामाला देखील लागले आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्ष एकसंधपणे चांगली कामगिरी करतील. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे पाटील यांचा भ्रमनिरास होणार आहे.

गेली 40 वर्षे शरद पवार यांचे नेतृत्व मानून आपण काम केले आहे. या कालावधीत त्यांच्या सुख-दुःखात सामील झालो. अग्निपरीक्षादेखील दिली आहे. त्यामुळे व्यक्तीला समोर करून बोलणे चुकीचे आहे. सावज आता आपल्या टप्प्यात आले आहे, असा पलटवार मंत्री मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्यावर केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT