मुरगुड: नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दणदणीत विजय मिळवत नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने केवळ बहुमताचा आकडाच गाठला नाही, तर नगराध्यक्षपदासह १६ जागांवर विजय मिळवून विरोधकांचे अक्षरशः पानिपत केले आहे. याउलट, राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांना मुरगुड मध्ये मोठा धक्का बसला आहे.
मुरगूड नगरपालिका निवडणूकीत शिवसेना भाजप युतीने दणदणीत विजय मिळवत माजी खासदार संजय मंडलिक व माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर सत्तेचा झेंडा फडकविला .२० जागापैकी शिवसेना भाजप युतीने १६ जागा तर विरोधी राष्ट्रवादी -शाहू आघाडीने चार जागा जिंकल्या . नगराध्यक्षाच्या चुरशीच्या निवडणूकीत शिवसेने च्या सुहासिनी प्रविणसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीच्या तसनीम जमादार यांचा १४७८ मतांनी पराभव केला. तब्बल ९ वर्षानंतर पालिकेच्या निवडणूका झाल्याने या निवडणूकीला राजकियदृष्टया वेगळे महत्व आले होते या निवडणूकीत महायुतीतच बिघाडी होवून कागल तालुक्याच्या राजकिय गटातटांचे राजकारण परंपरेप्रमाणे उफाळून आले .
आजवर पालिका निवडणूक मंडलिक व पाटील अशा दोन गटात अटीतटीने होत आल्या पण या निवडणूकीत मंडलिक विरुद्ध मुश्रीफ असाच राजकिय लढा पहायला मिळाला. मंत्री मुश्रीफ यांना समरजित घाटगे व गोकूळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांची साथ तर माजी खासदार संजय मंडलिक यांना माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांची साथ मिळाल्याने खऱ्या अर्थाने निवडणूकीला चांगलीच रंगत आली होती . या निवडणूकीत शिवसेना भाजप युतीने ( मंडलिक -पाटील ) १६ जागा पटकावल्या तर विरोधी राष्ट्रवादी -शाहू आघाडीला (मुश्रीफ -घाटगे ) केवळ चार जागावर समाधान मानावे लागले.
नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना व घेताना संजय मंडलिक व प्रविण पाटील यांचा राजकिय धूर्तपणा यशस्वी कामी आला . शिवसेनेतर्फे उमेदवार असलेल्या प्रविणसिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी पाटील व राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या पत्नी तसनीम जमादार यांच्यात झालेल्या लक्षवेधी लढतीत सौ .पाटील यांनी बाजी मारली या निवडणूकीत सौ सुहासिनी पाटील यांना ९८५६ एकूण मतापैकी ५१९३ तर तसनीम जमादार यांना ३ हजार ७१५ मते मिळाली . १४७८ मतांनी सौ पाटील यांनी विजय संपादन केला .
एकूण दहा प्रभागातून निवडून द्यावयाच्या २० जागामध्ये विजयी झालेले प्रभागनिहाय उमेदवार असे : प्रभाग १ अ भारमल रणजित विलास (४९१ - भाजप ) १ ब - पाटील संध्या उध्दव (३९९ शिवसेना ) प्रभाग २ अ . शिंदे विजयमाला दिपक (५७३ शिवसेना ) २ ब - खराडे सुहास पांडुरंग (६११ - शिवसेना ) ३ अ - आंगज गितांजली संभाजी (४५७ - शिवसेना ) ३ ब राजीगरे विजय मारती ( ४३७ शाहू आघाडी ) प्रभाग ४ अ . सोनुले बजरंग ज्ञानू ( ५८५ राष्ट्रवादी ) ४ ब . बारदेस्कर निकेलिन जेरोन (४६४ शिवसेना ) प्र ५ अ . रनवरे सुनिल अनंत (५५७ शिवसेना ) ५ ब . मांगले रेखाताई आनंदा (५७६ शिवसेना ) ६ अ . पुजारी सुजाता जगन्नाथ ( ६२५ भाजपा ) ६ ब पाटील सत्यजित अजितसिंह (५९ १ - भाजप ) ७ अ - चौगले संगीता प्रकाश (५४१ राष्ट्रवादी ) ७ ब चौगले शिवाजी विठ्ठल (५९९ शिवसेना ) प्र ८ अ . गोधडे वैशाली विक्रम (५४३ शिवसेना ) ८ ब आमते राजेंद्र गजानन (५०८ राष्ट्रवादी ) ९ अ - कांबळे संजीवनी राजेंद्र ( ५५९ शिवसेना ) ९ब . मंडलिक दतात्रय सातापा (६७७ शिवसेना ) १० अ - लोकरे सुरेखा पुंडलिक (४३९ शिवसेना ) १० ब - राऊत अनिल धोंडीराम (४२५ शिवसेना )
पालिका निवडणूकीसाठी प्रभाग क ५ अ मधून उभा राहिलेले राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे ७० मतांनी तर प्रभाग क्रं ८ ब मधून उभा राहिलेले शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके शंभर मतांनी पराभूत झाले .
या निवडणूकीत माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे नगरसेवकपदासाठी तर त्यांच्या पत्नी तसनीम जमादार नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पराभूत झाल्या .
पालिका निवडणूकीचा निकाल लागताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी विशेषतः शिवसेना भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून मोठा जल्लोष केला .