Mobile Dispute Murder| मोबाईल लवकर परत दिला नाही म्हणून खून 
कोल्हापूर

Mobile Dispute Murder| मोबाईल लवकर परत दिला नाही म्हणून खून

फाईव्ह स्टार एमआयडीसी सांगवडेवाडी हद्दीतील घटना; संशयितास अटक

पुढारी वृत्तसेवा

उजळाईवाडी : घेतलेला मोबाईल लवकर परत दिला नसल्याने शिवीगाळ केल्‍यामुळे झालेल्‍या वादातून संतप्त कामगाराने दुसऱ्या कामगाराच्या डोक्यात लोखंडी अँगल घालून खून केला. ही घटना कागल पंचतारांकित एमआयडीसी परिसरातील सांगवडेवाडी हद्दीतील एका गोडाऊनमध्ये बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली.

उत्कर्ष हनुमंतराव भोसले (४०, रा. पाईपलाईन रोड, बेळगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुहास दिलीप दुधडे (२८, रा. काळगाव, ता. कराड, जि. सातारा) याला अटक केली आहे. उत्कर्ष भोसले हा नटबोल्ट करणाऱ्या कंपनीत तर संशयित सुहास दुधडे हा स्क्रॅप व्‍यावसायिकाकडे काम करत होता. एकाच ठिकाणी दोघे काम करत असल्याने एकमेकांशी चांगले संबंध होते. यातूनच बुधवारी रात्री उत्कर्ष भोसले याचा मोबाईल दुधडे याने घेतला होता. तो लवकर परत दिला नसल्याने भोसले याने शिवीगाळ केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT