कोल्हापूर

MPSC मुख्य परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; कोल्हापुरातील मुदाळ येथील विनायक पाटील राज्यात प्रथम

backup backup

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : एमपीएससी मुख्य परीक्षेची गुणवत्ता यादी आज (दि. १८) जाहीर झाली. या यादीमध्ये राज्यात सर्वाधिक गुण मिळवत कोल्हापुरच्या उमेदवाराने मोठे यश प्राप्त केले आहे. विनायक पाटील असे या उमेदवाराचे नाव आहे. तो मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथील आहे.

एम .पी. एस. सी. मार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परिक्षेच्या मुख्य परिक्षेची यादी जाहीर झाली. या यादीमध्ये एकूण ६२२ गुण मिळवत विनायक राज्यात प्रथम आला आहे. त्याच्या गुणांवरुन उपजिल्हाधिकारी हे पद निश्चित झाले आहे. विनायक पाटील यांचे प्राथमिक शिक्षण मुदाळ येथील प्राथमिक शाळेत झाले. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण येथील प.बा. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात झाले. विनायकला दहावी मध्ये ९३.२० तर बारावी मध्ये 93.54 मार्क होते. पदवीचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे केले .बीएससी संख्याशास्त्र या विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली.बीएससी ला 82 टक्के मार्क त्यांने मिळवले.

घरची गरिबी, वडील मिळेल तो काम धंदा करून आपल्या उपजिवीके सोबत मुलाचे शिक्षण सांभाळत होते. कधी रिक्षा चालवून तर कधी चहा विकून आपला संसार वडिलांनी चालवला होता. सोबतीला थोडी शेती होती. अशाच सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने कोणताही खासगी क्लास न लावता स्वयं अध्ययन करून उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा 2022 मध्ये दिली. व पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळवले. उपजिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला. या अगोदर उपशिक्षणाधिकारी परीक्षा पास झाला होता. तसेच एसटीआय, एएसओ या परीक्षाही तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. विनायक पाटील यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कष्टाचे चीज झाले..

विनायक प्रारंभिक प्रारंभ पासूनच हुशार होता शिक्षणाची जिद्द होती मोठा अधिकारी होणार होता त्या दृष्टिकोनातून त्याने प्रयत्न केले होते व तो ध्येयवेढा होऊन अभ्यासात मग्न झाला होता आम्ही कुटुंबीयांनीही त्याला काही कमी पडू दिले नाही मिळेल ती कामे केली आमच्या कष्टाची चीज झाले मुलगा उपजिल्हाधिकारी झाला याचा अभिमान आहे.
नंदकुमार पाटील, वडील

SCROLL FOR NEXT