Dr. Smita Yogesh Jadhav Pudhari News
कोल्हापूर

Dr. Smita Yogesh Jadhav | डॉ. स्मिता जाधव यांना जिल्‍हा पदवीधर असोसिएशनचा जाहीर पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : महायुतीच्‍या पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना कोल्‍हापूर जिल्‍हा पदवीधर असोसिएशनने जाहीर पाठिंबा दिला. याबाबतचे पत्र असोसिएशनचे संस्‍थापक जिल्‍हाध्‍यक्ष बी. आर. पाटील-पाडळीकर यांनी दिले आहे.

पाटील यांनी दिलेल्‍या पाठिंबा पत्रात म्‍हटले आहे, जाधव परिवाराचे कोल्‍हापूरच्‍या विकासात मोठे योगदान आहे. कोल्‍हापूर शहरासह जिल्‍ह्याचा कोणताही प्रश्‍न असो या परिवाराने प्रश्‍न समजून घेऊन सोडवणूक केली आहे. डॉ. स्मिता जाधव यांच्‍या रूपाने पदवीधरांचे प्रश्‍न सभागृहात मांडण्‍यासाठी एक चांगला आवाज मिळाला आहे. पदवीधरांच्‍या प्रश्‍नांची जाण असल्‍याने डॉ. जाधव या पदवीधरांच्‍या विकासासाठी प्रयत्‍नशील राहतील, त्‍यामुळेच त्‍यांच्‍या दूरदृष्‍टीसह प्रभावी विचारांमुळे त्‍या पदवीधरांना न्‍याय देतील, याची पदवीधर असोसिएशनला खात्री झाल्‍याने असोसिएशन जाहीर पाठिंबा देत आहे. यावेळी बाजीराव देसाई, नंदकुमार दिवटे यांच्‍यासह असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्‍य उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT