कोल्हापूर : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटीविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी आंदोलनाचे प्रमुख अभिजित दीपके यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्या व आंदोलनाची भूमिका जाणून घेतली.
प्रसार माध्यमांशी बोलताना खा. शाहू महाराज म्हणाले, नीट परीक्षा पेपरफुटी ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून केंद्र सरकारने त्यांच्याशी तातडीने चर्चा करून योग्य तोडगा काढावा. न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे लोकशाहीविरोधी आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल करू नयेत.