जयसिंगपूर : येथील मच्छी मार्केट परिसरात गाडीवडर यांच्या घराजवळ नागरिकांची झालेली गर्दी. 
कोल्हापूर

Jaysingpur | दोन चिमुरड्यांसह आईने गळफास घेऊन जीवन संपवले

जयसिंगपूर मच्छी मार्केट परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : दोन चिमुरड्यांसह आईने गळफास घेऊन जीवन संपल्याची घटना शहरातील मच्छी मार्केट परिसरात घडली. संगीता राजू गाडीवडर (वय २५), मुलगी प्रगती राजू गाडीवडर (४) आणि मुलगा प्रतीक राजू गाडीवडर (दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री उघडकीस आलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, जीवन संपल्याचे कारण अस्पष्ट आहे.

मृत मुलांचे काका दत्ता हे सायंकाळी कामावरून घरी परतले. दरवाजा आतून बंद होता. त्यांनी बराच वेळ आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. प्रगती आणि प्रतीक ओढणीच्या साहाय्‍याने, तर संगीताने साडीच्या साहाय्‍याने गळफास घेतल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर शेजारी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली.

पती-पत्नीमध्ये वाद?

जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी आईने दोन मुलांना गळफास दिला आहे. त्यानंतर तिने स्वतः गळफास घेऊन जीवन संपवले आहे. दुपारी दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाल्याचे समजत असून, आम्ही अधिक तपास करीत आहाेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT