कोल्हापूर : दक्षिण अंदमान समुद्रात नैऋत्य मान्सून यंदा सात दिवस लवकर दाखल झाला आहे. ही गती कायम राहिल्यास कोल्हापुरात मान्सून 10 जून ते 12 जूनच्या दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात सामान्याहून अधिक पाऊस होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
भूगोलशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ
मान्सूनसाठी यंदा स्थिती सकारात्मक
पश्चिम महाराष्ट्रात अधिक पाऊस बरसणार
हिंद महासागरातील तापमानाचा सकारात्मक फरक मान्सूनला पोषक
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज नुकताच जाहीर केला. त्यानुसार सध्या एल निनो कमजोर पडत आहे आणि जून-ऑगस्टदरम्यान ला निनोची शक्यता फक्त 18 टक्के आहे. तर न्यूट्रल स्थितीची शक्यता 62 टक्के आहे. ही स्थिती पावसासाठी सकारात्मक ठरते. तसेच हिंद महासागरातील तापमानाचा फरक (आयओडी) सकारात्मक राहण्याची शक्यता असून, ही स्थिती नैऋत्य मोसमी वार्यांना बळकटी देईल. यामुळे कोकण, कोल्हापूर, सातारा आणि पश्चिम घाटामध्ये यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सूनने अंदमानात सात दिवस लवकर दाखल झाला असून जर ही गती कायम राहिली, तर कोल्हापुरात मान्सून 10 ते 12 जून दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. यंदा हिंद महासागरातील तापमानाचा फरक (आयओडी) सकारात्मक आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूरसारख्या भागात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे.डॉ. प्रशांत पाटील