मोहरे : येथील बाबासो रामचंद्र शेळके यांच्या माळरानावरील परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
मोहरे (ता. पन्हाळा) येथील बाबासो शेळके यांच्या शेताजवळील वाटेवर पशुवैद्यकीय डॉ. सचिन सुतार हे बुधवारी सायंकाळी जात असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी बिबट्याला आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये कैद केले आहे. सध्या परिसरामध्ये जनावरांच्या चार्यासाठी शेतकर्यांना शेतात जावे लागत आहे. मात्र बिबट्याच्या सततच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.