मोबाईल अ‍ॅप्स चीन, सिंगापूरमधून ऑपरेट 
कोल्हापूर

Loan from mobile | मोबाईल अ‍ॅप्स चीन, सिंगापूरमधून ऑपरेट

गरज बनली गळफास...

पुढारी वृत्तसेवा

सतीश सरीकर

कोल्हापूर : मोबाईलवरून कर्ज देणारे बहुतांश अ‍ॅप्स चीन, सिंगापूरसह इतर देशांतून ऑपरेट केले जात आहेत. त्यांचे सर्व्हर्स परदेशात असल्यामुळे सायबर क्राईमच्या पोलिसांना तपास कठीण होतो. काही प्रकरणांत ओळखींच्या व्यक्तींचा रेफरन्स देऊनच कर्ज दिल्यामुळे विश्वासाने लोक सहजपणे अ‍ॅप डाऊनलोड करून फसलेत.

सायबर क्राइमची नवी ‘फाइनान्शियल टेरर’ युक्ती

ऑनलाईन कर्ज देणार्‍या अ‍ॅप्सची कामे फक्त कर्ज देणे नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक नेटवर्कचा भाग आहे. त्यांचे उद्दिष्ट लोकांना लहान कर्ज देऊन मानसिक दहशत आणि भीती दाखवून जास्तीत जास्त वसुली करणे.

घर गहाण, मालमत्ता विक्रीची वेळ...

व्याज आणि दडपशाहीमुळे अनेक कुटुंबे आर्थिकद़ृष्ट्या कोलमडल्याची उदाहरणे आहेत. काही कुटुंबांनी कर्ज आणि व्याजाच्या चक्रातून सुटण्यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. यात घरातील सोने विकणे, पगारावर कर्ज काढणे, चिटफंडसारखे नवे कर्ज घेणे, शेती विकणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च थांबवणे आदींचा समावेश आहे. दरम्यान, एका व्यक्तीने सांगितले, ‘सुरुवातीला फक्त 8 हजार रुपये घेतले होते. आजपर्यंत 1 लाखापेक्षा जास्त पैसे गेले, तरीही फोन, मेसेज थांबत नाहीत. घर विकूनच सुटका झाली’. (उत्तरार्ध)

सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते...

बहुतेक अ‍ॅप्स रिझर्व्ह बँकेच्या लिस्टमध्ये नाहीत. त्यांचे सर्व्हर परदेशी कार्यरत

डेटा चोरी करून ‘फोटो मॉर्फिंग’ केले जातात

कर्ज देण्यापेक्षा व्याजाच्या वसुलीद्वारे पैसा मिळवण्याचा ‘बिझनेस मॉडेल’चा संबंधितांचा उद्देश

आर्थिक संकट अन् वसुलीच्या दबावाने गरजूंच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम

कर्ज अन् व्याज वसुलीसाठी सततच्या धमक्या, कॉल्स, गैरवर्तन अशा प्रकारच्या भीतीने अनेक तरुण नैराश्यात

कर्जातून फसलेल्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केल्याची माहिती

जागरूकता अन् कठोर कारवाईची गरज

आर्थिक शॉर्टकट शोधण्याच्या मानसिकतेनेच ऑनलाईन कर्जाचे व्यसन वाढत आहे. बेरोजगारी, पैशाची चणचण यामुळे तरुण मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. यासाठी सरकार, पोलिस, बँका यांच्याकडून शाळा, कॉलेज पातळीवर जागरूकता, बोगस अ‍ॅप्सना प्ले स्टोअर वरून हटवणे, आर. बी. आय.कडून कडक नियम, पोलिसांकडून सतत मोहीम, नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT