Gokul News File Photo
कोल्हापूर

Gokul Election| गोकुळमध्ये मंत्री हसन मुश्रीफ सोडून कोणीही सोबत चालेल

आ. शिवाजी पाटील : जिल्ह्यात भाजपविरोधी काम करत असल्याचा आरोप; महायुतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप विरोधात काम केल्याचा आरोप करत गोकुळमध्ये मंत्री मुश्रीफ सोडून कोणीही सोबत चालेल, अशी माझी भूमिका आहे. मात्र, महायुतीबाबत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे आमदार शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आ. पाटील म्हणाले, अवसायनातील दूध संस्था वगळून निवडणूक घ्या, अशी भूमिका मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेतली होती. गोकुळमध्ये चोख कारभार केलाय तर मग प्रशासक नियुक्तीचा इतका धसका का? असा प्रश्न केला. अजूनही काही गोष्टी समोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायालयाकडून ताशेरे

न्यायालयात 1320 दूध संस्था वगळून निवडणूक घेण्याची गोकुळची मागणी फेटाळली. अशा पद्धतीने संस्था वगळून निवडणूक घ्यायला या बिहार, पं. बंगालच्या निवडणुका आहेत का? असे ताशेरे न्यायालयाने ओढल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

ज्ञान घेऊन, अभ्यास करून समोर जाणार

चेअरमन नवीद मुश्रीफ मला ज्ञान नाही, असे म्हणतात. आता ज्ञान घ्यायला सुरुवात करणार आहे. संपूर्ण अभ्यास करूनच त्यांच्या पुढ्यात जाणार असल्याचा टोला आ. पाटील यांनी लगावला.

आबाजी, डोंगळेंची ईडी चौकशी होणारच

संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांची ईडी चौकशी होणारच आहे. तसेच त्यांच्या मर्जीतले सुपरवायझर, चालक, पीए यांचीही चौकशी होईल. त्यांच्याकडून आता मालमत्तांवरील नावे बदलण्याचे काम सुरू असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

वर्षात 1600 संस्थांची नोंदणी

गोकुळला 32 टक्के दूध पुरवठा चंदगड, आजरा, गडहिंग्लजमधून होतो. पण हे तीन तालुके गोकुळमध्ये कुठे आहेत. माजी मंत्री भरमूअण्णा यांना हयातीत 145 संस्था वाढवायला झाल्या नाहीत. मात्र मंत्री मुश्रीफ यांनी वर्षात 1600 दूध संस्थांची नोंदणी केली. चुकीच्या पद्धतीने नोंदणी केलेल्या संस्थांना विरोध असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT