MLA Shivaji Patil | जिल्‍हा बँक कारभाराची अनेक कागदपत्रे माझ्या हाती; वेळ येईल तेव्‍हा सादर करू  File Photo
कोल्हापूर

MLA Shivaji Patil | जिल्‍हा बँक कारभाराची अनेक कागदपत्रे माझ्या हाती; वेळ येईल तेव्‍हा सादर करू

आ. शिवाजी पाटील यांचा इशारा : मंत्री मुश्रीफ यांनी कारखान्‍यांना नियमबाह्य कर्ज दिल्‍याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेतील अनेक कारभाराची कागदपत्रे हाती आली आहेत. मंत्री हसन मुश्रीफ मोठे नेते आहेत. त्‍यांच्‍यावर केवळ आरोप करत नाही तर योग्‍य वेळी सर्व कागदपत्रे सादर करणार असल्‍याचा इशारा आमदार शिवाजी पाटील यांनी दिला. तसेच मंत्री मुश्रीफ यांनी कारखाने, जवळचे व्‍यक्‍ती यांना नियमबाह्य कर्ज दिल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला. त्‍याचबरोबर या सर्व कारभारावर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे लक्ष असल्‍याचेही आ. पाटील यांनी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना सांगितले.

आ. पाटील म्‍हणाले, जिल्हा बँकेच्या कारभाराशी संबंधित अनेक कागदपत्रे हातात आहेत. योग्य वेळी ती सार्वजनिक केली जातील. मुश्रीफ यांच्या वक्तव्यांमध्ये आणि प्रत्यक्ष कारभारामध्ये मोठी तफावत आहे. बँकेला यापूर्वी दोन लाखांचा आणि आता १३ लाख रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेकडून झाला आहे, याबाबतही गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्‍याचे आ. पाटील यांनी सांगितले.

गोकुळ दूध संघ निवडणुकीबाबत बोलताना त्‍यांनी मंत्री मुश्रीफ यांच्‍या नावे ४५ दूध संस्‍था कार्यरत आहेत. त्‍यांनी कधी गाय, म्‍हैस बघितली हा संशोधनाचा विषय आहे. गोकुळ मतदार यादीवर कायद्यानुसार काम सुरू आहे. १५०० संस्‍था निश्‍चित अपात्र होणार, असा विश्‍वास आ. पाटील यांनी व्‍यक्‍त केला. तसेच उद्धव ठाकरे यांच्‍या मंत्रिमंडळात आ. सतेज पाटील हे मंत्री होते. त्‍यावेळी किती घोटाळे झाले, हे त्‍यांनी पाहावे. ज्‍या परीक्षांमध्‍ये घोटाळे झाले ते काँग्रेसचे आहेत. सतेज पाटील पक्षीय राजकारण करत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT