कोल्हापूर

आमदार अपात्रता प्रकरण : उंचगावात ठाकरे गट आक्रमक; तीव्र घोषणाबाजी करत मुख्य चौकात निदर्शने

backup backup

उंचगाव; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना पात्र ठरवत शिवसेना पक्ष शिंदेंचा असल्याचा निर्णय दिला. या निकालाच्या विरोधात करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने उंचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक फलकास काळे फासून जोडे मारत व काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नार्वेकर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निदर्शने केली.

खरी शिवसेना ही जनतेच्या न्यायालयातच ठरणार : करवीर तालुकाप्रमुख राजू यादव

यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांचे गटनेतेपद व भरत गोगावले यांचे प्रतोदपद अवैध ठरवले होते. मात्र नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचे पालन न करता त्यांच्या नियुक्त्या वैध ठरवत सुप्रीम कोर्टाचा अपमान केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना सुरत, गुवाहाटीला पळून गेलेल्या गद्दार चोरांच्या घशात घालण्याचे काम नार्वेकर यांनी केले आहे. मात्र खरी शिवसेना ही जनतेच्या न्यायालयातच ठरणार आहे. व जनता यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. निकाल काहीही असला तरी आम्ही सर्व शिवसैनिक उद्धवसाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत असे सांगितले.

उंचगावातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दणाणला

यावेळी उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर व उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवसाहेब व आदित्यसाहेब यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, उपतालुकप्रमुख राहुल गिरुले, युवासेनेचे सुनील चौगुले, योगेश लोहार, संतोष चौगुले, सागर पाटील, सचिन नागटीळक, विराग करी,शरद माळी, बबलू मोरे, कैलास जाधव, बाळासाहेब नलवडे, गौरव धनवडे, सागर नाकट, सुनील पारपाणी, दिपक पोपटाणी, अजित पाटील, अजित चव्हाण, प्रमोद शिंदे, विनायक क्षीरसागर, मोहन आवळे, पवन आवळे, शैलेश पोवार, उलफ्त मुल्ला आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच चंद्रभागा अत्याळकर, आवसा सोनोले, शशिकला भोसले, निर्मला लोंढे, सुरेखा लोंढे, संगीता आवळे आदी महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT