कोल्हापूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर कॅफेत अत्याचार केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी कॅफेमालक राहुल वैभव कागले (वय २७, रा. सी वॉर्ड, कोंडाओळ, लक्ष्मीपुरी) याला गुरुवारी अटक केली.
नदिम सादिक पराडे (वय १९, रा. माऊली पुतळा चौक, राजारामपुरी, कोल्हापूर) याने २१ जुलैला अल्पवयीन मुलीस माणिक चेंबर येथील द पिझ्झा स्लाईस कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले होते. याची वाच्यता केल्यास तुझ्या घरच्यांना सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी बुधवारी नदिम पराडे यास अटक केली.